*संजय गांधी निराधार योजना*
निराधार महिला-पुरुष, अपंग, दुर्धर आजार झालेले, निराधार विधवा तसेच स्वावलंबन गमावलेल्यांना किमान आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लाभार्थी
१. ६५ वर्षाखालील निराधार पुरुष-महिला
२. अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग
३. क्षयरोग, एड्स, कर्करोग, कुष्ठरोग यामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे
४. निराधार विधवा. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा
५. घटस्फोटीत परंतु पोटगी न मिळालेल्या महिला
६. अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
७. तृतीयपंथ, देवदासी
८. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बेरोजगार पत्नी
९. ३५ वर्षांवरील अविवाहित बेरोजगार महिला
१०. सायकलग्रस्त
अटी
लाभार्थ्याचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक. • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत हवे.
No comments:
Post a Comment